डाॅ. जाधव यांच्या मराठ्यांची शस्त्रास्त्रे या अभ्यास संशोधन प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे अनुदान मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2023

डाॅ. जाधव यांच्या मराठ्यांची शस्त्रास्त्रे या अभ्यास संशोधन प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे अनुदान मंजूर

  

डॉ. मधुकर जाधव

चंदगड / प्रतिनिधी 
       चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे कार्यरत असलेले डॉ. मधुकर जाधव यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन येथील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने खास निधीतून मराठ्यांची शस्त्रास्त्रे एक चिकित्सक अभ्यास या विषयासाठी संशोधन अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे . त्या साठी त्यांना १ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
              डॉ. मधुकर जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास मंडळावर तसेच इतिहास परिषदेवर काम केले आहे. सध्या ते संजय घोडावत विद्यापिठाच्या अभ्यास मंडळावर व सातारा इतिहास परिषदेवर कार्यरत आहेत. त्यांची 2 पुस्तके व 135 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी युजीसी चा एक प्रकल्प पूर्ण केला आहे. उत्कृष्ट वक्ते म्हणून इतिहासावर त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रभर 950 व्याख्याने दिली आहेत त्यामुळे कमी कालावधीत नावारूपास आले असून आज पर्यंत त्यांना राज्यातील राजकीय, सामाजिक, पत्रकार संघटना अशा विविध संस्थेकडून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
                इतिहासावर त्यांचे प्रभुत्व असल्याने वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रकल्पासाठी निवड झाली असून त्यांना पुढील विविध विषयावर संशोधन करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळणार असल्याने आपण मोठ्या उत्साहाने आणखी काम करून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू तसेच शिवाजी विद्यापीठाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवू असे सांगून शेवटी विशेषता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी शिर्के, उपकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही. एन. शिंदे तसेच विद्यापीठातील कार्यालयीन सर्व सहकारी यांचे आभार मानले. डॉ. मधुकर विठ्ठल जाधव हे सिद्धेवाडी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत.


No comments:

Post a Comment