प्रा. डॉ. टी. एम. पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. टी. एम. पाटील (मूळगाव आमशी, ता. करवीर) यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी (विद्यावाचस्पती) पदवी जाहीर झाली. त्यांनी 'कोल्हापूर जिल्हा परिषदेचा इतिहास' (१९६२ ते २००२) या विषयावर संशोधन केले. डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यापीठास प्रबंध सादर केला. प्राचार्य पी. आर. पाटील यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment