तेऊरवाडी येथे शिव पुतळ्याचे भूमिपूजन करताना मान्यवर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संपूर्ण तेऊरवाडी गाव छ. शिवरायांच्या घोषणानी दुमदुमत तर होताच पण यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
तेऊरवाडी येथे काढण्यात आलेली कलश मिरवणूक |
येथील एकता फौंडेशनचा पुढाकार व तेऊरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून नविन वसाहतीत नविनच झालेल्या महिला सांस्कृतिक भवन समोर छ. शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संपूर्ण तेऊरवाडी बरोबरच कमलवाडी गावातील महिलांनी डोकीवर कलश घेऊन शिवज्योतीची मिरवणूक काढत भूमिपूजन स्थळी वाजत गाजत आणण्यात आली. मराठी विद्या मंदिरच्या झांझ, लेझिम व मर्दानी लाठी काठी खेळाणे सुंपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी शिवरायांच्यावर मनोगतेही व्यक्त करण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन व विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर संपूर्ण उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला तेऊरवाडी गावातील सर्व अबाल वृद्ध व माहेरवासिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक दयानंद पाटील यांनी केले. संचालन एम. ए. पाटील व एन. व्ही. पाटील यानी केले.
No comments:
Post a Comment