राजू शेट्टी यांचा ऊस दराबाबत पाटणे फाटा येथे शेतकरी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2023

राजू शेट्टी यांचा ऊस दराबाबत पाटणे फाटा येथे शेतकरी मेळावा


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     एफ. आर. पी. प्रमाणे गत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये व चालू वर्षीची पहिली उचल ३५०० रुपये मिळालीच पाहिजे, ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत.  
    मागणीच्या पूर्ततेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांत जागृती करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता व्ही. के. चव्हाण- पाटील महाविद्यालय पाटणे फाटा येथील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. 
   संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच  राज्य सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  या मेळाव्याला चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन  जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment