कुदनूर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ४४ स्पर्धकांचा सहभाग, इंडियन ग्रुप पुणे व दीपिका हेब्बाळकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2023

कुदनूर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ४४ स्पर्धकांचा सहभाग, इंडियन ग्रुप पुणे व दीपिका हेब्बाळकर प्रथम


कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा       
      योद्धा ग्रुप कुदनुर (ता. चंदगड) आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. गाव मर्यादित आणि खुल्या गटात एकूण ४४ स्पर्धकांनी भाग घेतला. 
       खुल्या गटात तील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे एंजल ग्रुप (पुणे), मयुरी धामणेकर (बेळगाव), बीट ब्रेकर्स ग्रुप (बेळगाव), अंबिका ग्रुप (बेळगाव), मैथिली पाटील (बेळगाव), किरण पाटील (बेळगाव), सेजल देसाई (नेसरी)  तर गाव मर्यादित स्पर्धेत अनुक्रमे दीपिका हेबाळकर, शिवकन्या ग्रुप, विद्यानगर गर्ल्स ग्रुप, श्रद्धा कुंभार, अलका कोले यांनी बक्षीसे पटकावली सर्व विजेत्यांना सरपंच संगीता घाटगे, राजू रेडेकर, अमृत कोले आदींच्या हस्ते रोख बक्षिसे व चषक देण्यात आले. 

     परीक्षक म्हणून सागर हेब्बाळकर, लक्ष्मण शहापूरकर, शंकर कोरी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नामदेव पवार, प्रभाकर राऊत, जोतिबा पाटील यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष अविनाश हुद्दार यांनी आभार मानले. यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील स्पर्धक व नृत्य शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment