दिवाळीचा आनंद वंचित घटकांना वाटत असताना सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील |
जालना : सी. एल. वृत्तसेवा
तिमिरातून तेजाकडे नेणारा, अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. समाजातील सर्व स्तरांत हा मंगलमय, आनंददायी आणि नवचैतन्य निर्माण करणारा सण आपापल्या परीनं साजरा केला जातो. तथापि तो आनंद प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही.
सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना गरीबीमुळे अनेक जण यापासून वंचित असतात. त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करण्याच्या भावनेतून जाफराबाद, जिल्हा जालना शेतकरी पुत्र हर्षल पाटील फदाट यांनी "आपुलकीची दिवाळी" उपक्रम हाती घेत, वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केला. गरजुंना फराळ, मिठाई, कपडे वाटप केले. गरिबांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हर्षल पाटील गेली तीन वर्षे हा उपक्रम राबवीत आहेत.
No comments:
Post a Comment