कोवाड येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजनचा कार्यक्रम घेण्यात आला.
तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणीना उजाळा देत आज मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ताठ मानेने जगत आहेत. काही लोकांनी त्यांच्या पश्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुणाच्या तर पक्षाच्या दावणीला बांधले. अशा या गद्दारांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी शाखाप्रमुख संतोष भोगण म्हणाले, शिवसेना ही अभेद्य असून महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अजून बळकट होत असून येत्या कालावधीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचाच असेल. त्याचप्रमाणे चंदगड तालुक्यातील शिवसेना ही भक्कम असून मोजके गद्दार हे तळ्यात मळ्यात करत असून तेही उध्दव साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवाहात येत आहेत असे सांगितले.
यावेळी उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, कोवाड शाखाप्रमुख संतोष भोगण, गटप्रमुख रवींद्र पाटील, नागरदळे शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, विनायक कुट्रे, गजानन पाटील, राम मनवाडकर, किशोर कुंभार, आनंद नाईक, नरसू पाटील, अनिरुद्ध कुट्रे, शिवाजी शहापूरकर, महिला उपतालुकाप्रमुख सौ. गुलाबी शिंदे, श्रीमती शीला पाटील, सौ. रेखा मनवाडकर, सौ. अनिता मनवाडकर, रेश्मा पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment