किल्ला स्पर्धेत खांदेरी उंदेरी जलदुर्ग प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2023

किल्ला स्पर्धेत खांदेरी उंदेरी जलदुर्ग प्रथम

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          शौर्य प्रतिष्ठान कालकुंद्री (ता. चंदगड) मार्फत भव्य किल्ला बांधणी स्पर्धा यंदा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक - उंदेरी खांदेरी जलदुर्ग (ओमकार पाटील व मित्र मंडळ), द्वितीय क्रमांक-  लोहगड (स्वराज्य बालमित्र मंडळ) व पन्हाळा (भिमक्रांती मित्रमंडळ), 

ओमकार पाटील व मंडळांनी साकारलेला खांदेरी - उंदेरी हा जोड जलदुर्ग
      तृतीय क्रमांक- प्रतापगड (जगदंब ग्रुप यादव गल्ली) व राजगड (राजेवाडी ग्रुप), चतुर्थ क्रमांक- प्रतापगड (मोरया ग्रुप शिवाजी गल्ली) व राजगड (सावरकर नगर बाॅईज) यांनी क्रमांक पटकावले. या स्पर्धेत एकूण २६ मंडळांनी सहभाग घेतला होता. सहभागी सर्व स्पर्धकांचे कालकुंद्री ग्रामस्थ व शौर्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.No comments:

Post a Comment