कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी जोतिबा पाटील (वय १०५) यांचे आज सोमवार दि. ०६/११/२०२३ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता मारुती पाटील यांच्या त्या सासुबाई होत. त्यांच्या पश्चात चिरंजीव, सुना, चार मुली, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी मंगळवारी सकाळी १० वाजता कालकुंद्री येथील स्मशानभूमीत होणार आहे.
No comments:
Post a Comment