महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन द्यावी, श्री राम ज्येष्ठ नागरिक संघटनेची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2023

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन द्यावी, श्री राम ज्येष्ठ नागरिक संघटनेची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन द्यावी. अशी मागणी हेरे येथील श्री राम ज्येष्ठ नागरिक संघटनेने मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनातू केली आहे. 

       निवेदनात म्हटले आहे की, ``राज्यातील शेतकरी, कामकरी, शेतमजुर हा देशांचा खरा पोशिंदा आहे. तो वयाच्या ७५ वर्षापर्यंत शेतात कष्ट करुन, घाम गाळून शेती पिकवतो. रात्र-दिवस कष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. ऊन, पाऊस, थंडी, वारा अंगावर घेऊन शेत पिकवतो. तेच अन्नधान्य खाऊन देशातील जनता जगते आहे. तोच पोशिंदा आज म्हातारपणी उपाशीपोटी, हालअपेष्ठा सोशित जगतो आहे. म्हणून अशा या 'ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन मिळावी.

         राज्यातील कर्मचारी, खासदार, आमदार यांना पेन्शन मिळते. मात्र शेतकरी व कामकरी मात्र वंचित आहे. शेजारी कर्नाटक राज्यातील ज्येष्ठांना पेन्शन मिळते. एवढेच नाहीतर गृहलक्ष्मीला ही १ हजार रुपये दरमहा मिळतात. हे तर काहीच नाही. कमी उत्पन्न असलेल्या लहान गोवा राज्यातील ज्येष्ठाना पेन्शन मिळते. मात्र प्रगत व संपन्न महाराष्ट्रात ज्येष्ठांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे शेजारील राज्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातही जेष्ठांना पेन्शन मिळावी अशी मागणी श्री राम ज्येष्ठ नागरिक संघटनेने निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे. 

No comments:

Post a Comment