चंदगडला बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2023

चंदगडला बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा


नंदकुमार ढेरे / चंदगड -प्रतिनिधी

    तालुक्यात दुस-या टप्यात निवडणूकीसाठी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरीत १९ ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये बहुतांश ११ ग्रामपंचायतीत भाजपाचे सरपंच, ७ ग्रामपंचायतीत आम. राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादीला तर ४ ठिकाणी स्थानिक आघाड्याना यश मिळाले.मिरवेेल,आंबेवाडी,बुझवडे या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तहसील कार्यालयातील तळमजल्यात १० टेेबलवर मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुुुुरवात झाली. ९वाजता भोगोली ग्रामपंचायतीचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजेश चव्हाण यानी जाहीर केला.विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करून फटाक्यांची अति बाजी केली.जस-जसे गावांचे निकाल जाहीर होत होते. तसे-तसे कार्यकर्ते उड्या मारुन जल्लोष करत होते. मोठमोठ्याने स्थानिक आघाडी व नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा व गुलालाची उधळण करत होते. मशीनवर मतदान झाल्याने सर्व १९ ग्रामपंचायतींचा दुपारी बारापर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. पोलिस निरिक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होता.


ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे


भोगोली - जगन्नाथ गावडे (सरपंच) जयसिंग काबंळ , पार्वती गावडे,लीला गावडे, रमेश चौगुले,शितल बांदेकर, शाहू तेजम,रूपाली शिरोडकर


कलिवडे - अस्मिता अशोक कदम (सरपंच) नेताजी सुभेदार,सावित्रीबाई काबंळे,आनंद काबंळे,पार्वती पाटील, सुरेश देसाई, पुनम काबंळे,बमाबाई लांबोर 


तांबूळवाडी - गिता पाटील (सरपंच) संजय पाटील, सुगंधा पाटील, शोभा भोसले,प्रमोद पाटील, स्मिता सावंत, प्रकाश पाटील, रेश्मा पाटील 


सडेगुडवळे - प्रभावती गावडे (सरपंच) नारायण गावडे,विजय पाटील, विमल जाबरेकर,अस्मिता फाटक, वंदना गावडे,संतोष काबंळे,संध्या झेंडे, 


कडलगे खुर्द - रविकिरण पाटील (सरपंच) आनंद पाटील, कविता पाटील, सरिता पाटील, निंगाप काबंळे,निता पाटील, गणपती तुमसर,ज्योती पाटील 


कुरणी/धामापुर - संतोष मोरे (सरपंच)एकनाथ खवणेवाडकर,पुष्पा गुडूळकर,प्रमिला मोरे,प्रल्हाद पाटील, सुशिल पोटफाडे, शितल गावडे,काजल गुरव,अनंंत केरकर,रेश्मा गावडे


गणूचीवाडी-- सागर भादवणकर(सरपंच)दशरथ क॔ग्राळकर,प्रकाश विठोबा भादवणकर, प्रकाश दत्तू भादवणकर, रत्ना आर्दाळकर, सुशिला आर्दाळकर, मंगल आर्दाळकर, अनिता आर्दाळकर 


शिरोली/सत्तेवाडी - पाडुरंग देवलकर (सरपंच) मोहन गावडे,शालन शिताप,किरण मासरणकर,आनंद दोरूगडे, मेघा नााईक,माधूरी पाटील, सरिता शिंदे 


शिवनगे -- संतोष शिवनगेकर (सरपंच) प्रकाश पाटील, श्वेता पाटील, सुमन सांबरेकर, मारुती पाटील, रेणूका मुंगारे, मंदार पाटील, सुषमा पाटील 


मुरकूटेवाडी -- सटुप्पा दळवी (सरपंच)रामु चव्हाण, साधना चव्हाण, ज्योती जाधव,दीप्ती जाधव,भुताना आपके,विमल चव्हाण, भावकू आवडण


उमगाव -- राधा कृष्ण सावंत (सरपंच) परशराम तळकटकर, दत्ताराम रेडेकर,आपेक्षा पेडणेकर, नंदिनी गावडे, पार्वती गावडे,दत्ताराम नांगरे,सुभाष पेडणेकर, निकीता पेडणेकर 


कानूर खुर्द -- देवेंद्र नार्वेकर (सरपंच) अंबादास पाटील, संजना पाटील, मधुकर गावडे, स्नेहा गावडे,तुकाराम काबंळे,विशाल गावडे, वैशाली गावडे,अश्विनी काबंळे,सुमित्रा अमृसकर 


तुर्केवाडी -- संजीवनी ओऊळकर (सरपंच) कौशल बांदिवडेकर, सावित्रीबाई गावडे,विश्वनाथ ढेकोळकर, सुरेखा चौगुले,दशरथ काबंळे,भक्ती बसापूरे,मशिदाबी शेख,प्रकाश पवार,प्रिया मातोंडकर,शाांता लाड,संजय गावडे,अमृत दोरूगडे,वैैैजयंता तरवाळ,


माणगाव -- रेणुका नरी (सरपंच)संदीप बेनके,सूनिल सुरूतकर,संजय फडके,शांता पिटूक,अर्चना चव्हाण, रेणूका परसू नरी,रघुनाथ कांबळे,वनिता सावंत, मारुती चिगरे,द्रौपदा चिंचणगी, अलका कुंभार, तुळसा ससेमारी,


 कोदाळी -- योगिनी दुवे (सरपंच ) विठ्ठल गावडे,अनुराधा गावडे,सोनाली गावडे,बाबू लांबोर, रमेश गावडे,सुवर्णा दळवी,पुंडलिक दळवी,शोभावती दळवी,पार्वती पवार 

आमरोळी/पोरेवाडी -- प्रकाश वाईंगडे (सरपंच)रामचंद्र पाटील, नीता पाटील, प्रिया पाटील, शिवराम नाईक, भारती नाईक, अनुराधा गुरव, संजय गावडे,दयानंद यादव,मनिषा कदम


लाकूरवाडी -- शोभा राजगोळकर (सरपंच)तुकाराम तुपारे,वंदना गावडे,रमेश बूच्चे, सुवर्णा निट्टूरकर, शांता निट्टूरकर, हरिबा कडोलकर, रेणूका कोळसेकर


उत्साळी --वनिता सुतार (सरपंच)सुभाष मुसळे,गीता देसाई, रंजना देसाई, राजाराम आंबूलकर,गीता मधुकर देसाई, कांता आपटेकर,जालिंदर सावंत भोसले 


जट्टेवाडी -- रेणूका बुवा (सरपंच बिनविरोध) प्रमिला पाटील, सुभद्रा संतू पाटील, विजय पाटील, मोहन पाटील, गावडू पाटील, श्रेया पाटील, सुभद्रा सदाशिव पाटील 


बोजूर्डी/मोरेवाडी या पोट निवडणुकीत प्रभाग एक मधून मिनाक्षी पाटील तर प्रभाग दोन मधून मनिषा धनूकटेकर या महिला उमेदवार निवडून आल्या, तर शिनोळी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्यया पोटनिवडणुकीत प्रभाग तीन मधून केतन खाांडेकर,लक्ष्मीबाई करटे,नम्रता पाटील या विजयी झाल्या.


तहसिलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक नायब तहसीलदार हेमंत कामत, अमर साळोखे, नेहाल मुल्ला,शरद मगदूम, बाळसो सरगर,अमर पाटील, अरूण शेट्टी आदीनी निवडणुक प्रक्रिया पार पाडली.



No comments:

Post a Comment