चंदगड / प्रतिनिधी
देवरवाडी (ता. चंदगड) येथे जंगल परिसरात असलेल्या शेतामध्ये घुसून जंगली गव्याच्या कळपाने काल रात्री मोठी नासधूस केली आहे.
काल रात्री गव्याच्या कळपाने गट नंबर १७५/३,१७५/५,१६६ मधील मनोहर लक्ष्मण भोगण, मारुती लक्ष्मण भोगण, इराप्पा लक्ष्मण भोगण, नारायण लक्ष्मण भोगण, अमृत सुरेश भोगण, विजय रामा भांदुर्गे या शेतकऱ्यांचा शेतातील भात, ऊस,ज्ञरताळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वनविभागाने
ताक्ताळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
बाजारभावानुसार नुकसान भरपाई मिळावी
ऐन सुगीत जंगली प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असून वनविभागामार्फत दिली जाणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. वाढलेल्या महागाईत खते, मजुर, बियाणे, लाईट बील याचा हिशेब घातला तर मिळालेली नुकसान भरपाई व प्रत्यक्षात पिकांसाठी केलेला खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शासनाने नुकसानीची रक्कम बाजारभावानुसार द्यावी.
अन्यथा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा चंदगड तहसील कार्यालयावर काढण्यात इशारा सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत (देवरवाडी) यांनी दिला आहे.



No comments:
Post a Comment