चंदगड / प्रतिनिधी :- (नंदकुमार ढेरे)
चंदगड तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील आज झालेल्या १९ ग्रामपंचायतीसाठी शांततेत सरासरी ७५.०९ टक्के मतदान झाले. १८० सदस्याचे तर १७ सरपंचाचे भवितव्य मशिन मध्थे बंद झाले. उद्या सोमवारी तहसील कार्यालयाच्या तळमजल्यामध्थे १२ टेबलावर मतमोजणी होणार आहे. ३१ सदस्यासह आंबेवाडी, मिरवे
सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी उमेदवारांनी एकेक मतदार आणण्यासाठी वाहतूक यंत्रणा पध्दतशीरपणे राबविली होती. सकाळी ७.३० वा च्या पहिल्या सत्रात १५.९८ टक्के, साडेे आकराच्या वाजेपर्यंत ३७.२१ टक्के, दिड वाजेपर्यत ६१.५० टक्के तर साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत ७५.०९ टक्के मतदान झाले. सुगीचे दिवस असल्याने सकाळी भात कापणी करून दुपारनंतरच मतदारांनी मतदान करणे पसंद केले. त्यामुळे साडेतीन पर्यंत मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील तुर्केवाडी, माणगाव, कानूर खुर्द, आमरोळी या मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी उमेदवारांनी योजनाबद्ध नियोजन करुन आजारी, बाळंतिनी व परगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी विशेष यंत्रणा राबविली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजेश चव्हाण यांनी मतदानस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिस निरिक्षक नितीन सावंत यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे -- कडलगे खुर्द (८८.३६),जट्टेवाडी (९१.८६),कलिवडे (८६.४६),कोदाळी (६४.९८),शिरोली (७६.६१),भोगोली (८४.०३),कानुर खुर्द (७७.१९),उमगाव (७६.०५), लाकुरवाडी (८३.१०),शिवनगे (८०.१९),सडेगुडवळे (६८.४४),कुरणी (८५.०३),तूर्केवाडी (६०.१२),तांबुळवाडी (८१.३५),माणगाव (६७.३४),मुरकुटेवाडी (८६.०१),उत्साळी (८२.९८),आमरोळी(७६.३७),गणुचीवा
या निवडणुकीत एकूण २४७३४ मतदार मतदानासाठी पात्र होते,त्यापैकी पुरूष १०७९६ व स्त्री १०२७४ अशा एकूण २१०७० मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.
सर्वात कमी तुर्केवाडी ग्रामपंचायतीसाठी झाले मतदान
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या तुर्केवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वात कमी म्हणजे ६०.१२ टक्के मतदान तर जट्टेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक ९१.६६ टक्के मतदान झाले. वाढलेले व कमी झालेल्या मतदानाच्या फटका कुणाला बसणार हे उद्या मत मोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.
No comments:
Post a Comment