तेऊरवाडीची स्वाती पाटील मुंबई अग्नीशामक दलात दाखल, फायर गर्लचे सर्वत्र अभिनंदन - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

तेऊरवाडीची स्वाती पाटील मुंबई अग्नीशामक दलात दाखल, फायर गर्लचे सर्वत्र अभिनंदन

कु. स्वाती लक्ष्मण पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    आपल्या वेगवान धावण्याने राज्य व देशपातळीवर अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील कु. स्वाती लक्ष्मण पाटील हिची मुंबई महानगरापालिकेच्या अग्निशामक दलामध्ये निवड झाली.

       येथील लक्ष्मण निंगाप्पा पाटील (मुकुंद गावडे) या शेतकऱ्यांची कु. स्वाती धावण्यामध्ये अत्यंत चपळ आहे. बालपणा पासून वडिलांना शेतीमध्ये सतत मदत करत आपला धावण्याचा छंदही जोपासला आहे. धावण्याच्या विविध प्रकारात केवळ राज्य नाही तर देशपातळी पर्यंत मजल मारली आहे. मुंबई महानगपालिका अग्निशामक दलात निवड झाल्याने सोमवार २० नोव्हेंबर रोजी स्वाती प्रशिक्षणासाठी मुंबईला हजर झाली. 

       तेऊरवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात शासकिय -निमशासकीय नोकर असले तरीही अग्निशामक दलात कोण कार्यरत नव्हते. ती उणीव स्वातीने भरून काढल्याने तीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कष्ट अन् मनामध्ये प्रचंड जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते. मुलींनी मनामध्ये कोणताही न्यूनगंड न ठेवता सतत प्रयत्न करत राहिल्यास यशाचे उत्यूंग शिखर गाठता येते. असे मनोगत स्वातीने चंदगड लाईव्ह प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment