किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता चार वर्षे रखडलेल्या स्थितीत, रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, बांधकाम व वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता चार वर्षे रखडलेल्या स्थितीत, रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, बांधकाम व वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता चार वर्षे रखडलेल्या स्थितीत, रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, बांधकाम व वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

चंदगड / प्रतिनिधी

    कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता वन विभाग व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणा मुळे गेल्या चार वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास बांधकाम विभाग वनविभाग यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पारगड किल्ला दशक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

      मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता झाला पाहिजे. यासाठी गेल्या काही वर्षांत पारगड मोर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांनी अनेक उपोषण आंदोलने केली. या नंतर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे पालकमंत्री असताना मोर्ले ते पारगड किल्ला रस्त्याला मंजुरी दिली. या नंतर या ठिकाणी वन विभाग यांच्या हद्दीतील झाडे तोडून काम सुरू करण्यात आले. या रस्त्याचे काम वन विभाग यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत हे काम करून घेणे बांधकाम विभागासह संबंधित ठेकेदार यांची जबाबदारी होती. पण याकडे दुर्लक्ष केले. कामाला विलंब केला. त्यामुळे वन विभाग यांनी मुदत संपली त्यामुळे काम करायला मज्जाव केला.

    गेल्या चार वर्षांपासून मोर्ले ते पारगड किल्ला काम रखडले आहे. ते सुरु करावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पारगड किल्ला मोर्ले घोटगेवाडी येथील ग्रामस्थ मागणी करत आहेत. बांधकाम विभाग वन विभाग यांना निवेदन दिले आहे. लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले. पण अद्याप वन विभाग किंवा बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही असे रघुवीर शेलार यांनी सांगितले.

      वन विभाग कडून पुन्हा परवानगी घेऊन काही महिन्यांत काम सुरू करू असे बांधकाम विभाग अधिकारी यांनी सांगितले होते. पण अद्याप दोडामार्ग किंवा चंदगड हद्दीत चार वर्षांपासून रखडलेल्या मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता चालना मिळाली नाही. या मतदार संघाचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकारी वन विभाग कडून काय उपयोजना केली. याची माहिती घेऊन तातडीने काम करायला सुरुवात करायला आदेश देवून काम सुरू करावे.

    मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला डिसेंबर पर्यंत सुरूवात झाली नाही तर पारगड किल्ला मोर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थ बांधकाम वन विभाग यांच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा पारगड किल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment