कानुर खुर्द येथे विश्वकर्मा योजना मोफत नोंदणी कॅंम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

कानुर खुर्द येथे विश्वकर्मा योजना मोफत नोंदणी कॅंम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

कानुर खुर्द येथे विश्वकर्मा योजना मोफत नोंदणी कॅंम्पला उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कानूर खुर्द (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १८ पारंपारिक कारागिरांना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने महत्वकांक्षी विश्वकर्मा योजना या योजनेची सुरुवात कानूर खुर्द येथून करण्यात आली. या योजनेचे  विधानसभा समन्वयक सचिन बल्लाळ, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील, कानूर गावचे नवनियुक्त सरपंच देवेंद्र भाऊ नार्वेकर यांच्या उपस्थितीत कॅंम्पचा शुभारंभ करण्यात आला.
      यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, ``अनेक योजना तळागाळात पोचवले आहेत. एक नामी संधी म्हणून या योजनेच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक घटकाला याचा लाभ देण्याचा प्रामाणिक व निष्ठेने काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीने दिलेली संधी आणि त्या संधीचे सोने करण्याचे काम मी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षा योजनेमुळे आज तळागाळापर्यंत प्रत्येक कारागिरांना याचा लाभ होणार आहे. घराघरापर्यंत ही योजना पोचवण्याचं काम मी चंदगडमध्ये प्रामाणिकपणे करणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना योजनांबाबत नियोजनात्मक कार्यक्रम आखला जातो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उत्स्फूर्तपणे काम करण्याची ऊर्जा मिळते.``
       भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील म्हणाले की,`` तालुक्यातील प्रत्येक तरुण हा भारतीय जनता पार्टीला जोडला जात आहे. तरुण वर्गाचे काहीतरी देणे लागतो. त्या दृष्टिकोनातून तरुणांच्या हातातील कामाला चालना देण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. कॅम्प नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहोत.
       कानूर खुर्द येथील या विश्वकर्मा योजना कँम्पमध्ये आज 283 अर्ज भरल्याचे सरपंच देवेंद्र नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी दिलीप पाटील, तुकाराम गावडे, तुकाराम गावडे, तुकाराम कांबळे, अश्विनी कांबळे, वैशाली गावडे, मधुकर गावडे, अनंत झेंडे, श्री. चिटणीस, संगम नेसरीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पप्पू सोनवणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment