कालकुंद्री येथे डिसेंबरमध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2023

कालकुंद्री येथे डिसेंबरमध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सुवर्ण भारत फ्रेंड सर्कल यांच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय प्राथमिक शाळा व श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे इयत्ता १ ते ७ लहान गट तर इयत्ता ८ वी पासून पुढे खुला अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे.

     लहान गटासाठी रोख बक्षीसे अनुक्रमे रुपये ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ७०१, ६०१, ५०१, ३०१, १५१ अशी १० व खुल्या गटासाठी अनुक्रमे रोख रुपये- ७००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ७५१, ५५१, ४०१, ३०१ अशी १० बक्षीसे तसेच सर्व वीस विजेत्यांना शिवस्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सर्व प्रश्न छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असतील. प्रश्न वस्तुनिष्ठ असून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय राहतील. 

       लहान गटासाठी ५० प्रश्न १०० गुण तर खुल्या गटासाठी १०० प्रश्न २०० गुण, वेळ १ तास (सकाळी १० ते ११) रहिल. लहान गटातील स्पर्धकांनी शाळेचे बोनाफाईड आणणे बंधनकारक आहे.  समान गुण पडल्यास त्याच ठिकाणी पुन्हा १० प्रश्न देऊन निकाल जाहीर करण्यात येईल. बक्षीस वितरण सायंकाळी ७.०० वाजता समारंभ पूर्वक करण्यात येणार असून यावेळी प्रसिद्ध कथकथनकार प्रा. सर्जेराव खरात यांचा कथाकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  

       २२ डिसेंबर पर्यंत स्पर्धकांनी आपला प्रवेश निश्चित करण्याचा आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी १०० रुपये असून प्रवेश फी भरल्यानंतर तात्काळ १२०/- रुपये किमतीचे शिवचरित्र पुस्तक मोफत दिले जाणार आहे. नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर- 9823946085/ 8879788386/ 9423303053/ 8888467047/ 7499187143 वर संपर्क साधण्याचे आवाहन सुवर्ण भारत फ्रेंड सर्कल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment