![]() |
सायकल रॅलीतील सहभागी युवक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
पुणे ते कन्याकुमारी पर्यंत विविध सामाजिक संदेश देत जाणाऱ्या सायकल रॅलिला चंदगड लाईव्ह न्यूजच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
इंडो अथलेटीक्स सोसायटी पुणे (IAS) कडून दक्षिण दिग्वीजय मोहिमे अंतर्गत पुणे ते कन्याकुमारी अशी १६३० किमी लांबीची सायकल रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीमध्ये पूणे येथील ७ सायकलपटू सहभागी झाले आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे लावा - पृथ्वी वाचवा, स्वच्छ भारत अभियान असा संदेश देत हि सायकल रॅली ठिकठीकाणी शाळातील विद्यार्थ्याना विविध संदेश देत कन्याकुमारी कडे जात आहे. पुणे कराड बेळगाव, येलापूर, मुर्ढेश्वर, मंगळूरू, थालसरी, तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी अशी ही सायकल रॅली रोज जवळपास २५० किमीचा प्रवास करत कन्याकुमारीला पोहचणार आहे.
या रॅलीमध्ये टिम लिडर युवराज पाटील, संदिप परदेशी, आनंद गुंजाल, प्रशांत सगरे, प्रविण जगदाळे' चैतन्य वंझारे सहभागी झाले आहेत. या सर्वांना IAS चे अध्यक्ष गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, प्रदिप टाके, संतोष नखाते, गिरीराज उमरीकर, आनंद लोंढे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर चंदगड लाईव्ह न्यूजच्या वतीने पत्रकार एस. के. पाटील व रमेश बसाण यांनी हत्तरगी येथे राष्ट्रीय महामार्गावर जाऊन या सायकल रॅलीतील सर्वांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment