पगारापासून वंचित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत प्राचार्यानी साजरी केली दिवाळी - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2023

पगारापासून वंचित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत प्राचार्यानी साजरी केली दिवाळी

 


चंदगड / प्रतिनिधी

       दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण, दिवाळी म्हणजे सुख वाटण्याचा सण. वंचितांच्या आनंदाच्या सणात वाटेकरी होऊया या उदात्त हेतूने धनंजय विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या संगीता पाटील यांनी शाळेतील पगारापासून वंचित असणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सणात आनंद वाटण्यासाठी आपला प्रयत्न केला.

      काही तांत्रिक अडचणीमुळे पगारापासून वंचित असणाऱ्या शाळेतील पाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून  प्रत्येकी  फराळ सोबत कर्मचाऱ्यांना ड्रेस आणि त्यांच्या पत्नीला साडी देऊन त्यांच्या या दिवाळी सणात आनंद वाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौतुक होत आहे. या पाचही कर्मचाऱ्यांनी या कार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

No comments:

Post a Comment