चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ - वंचितांच्या दिवाळीसाठी कपडे व फराळ देण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2023

चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ - वंचितांच्या दिवाळीसाठी कपडे व फराळ देण्याचे आवाहन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण दिवाळी म्हणजे सुख वाटण्याचा सण, दिवाळी म्हणजे अंधार दूर करण्याचा सण. पण आज सुध्दा कित्येक कुटुंबे या आनंदापासून दूरावली आहेत. ऊसतोड कामगार, रस्ते बांधकाम, भंगारगोळा करणारे अशा वंचितांच्या आनंदाच्या सणात वाटेकरी होऊया. 

       या उद्देशाने चंदगड मराठी अध्यापक संघातील गुरूमाऊली व बेळगाव जिल्हातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या बेळगाव मिडिया असोसिएशनचे पदाधिकारी यांनी भटक्या, वंचित घटकातील लोकांसाठी कपडे व फराळ देण्याचे आवाहन केले आहे. रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा  पाटणे फाटा येथे उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment