सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश, अवास्तव धनादेशाची मागणी रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2023

सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश, अवास्तव धनादेशाची मागणी रद्द


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
        गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींना अवास्तव धनादेश काढण्यासंबंधी तगाचा लावण्यात येत होता. जिल्हा परिषद कोल्हापूर कडून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत बक्षीस रकमेतून २१ हजार रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग केली होती. सदर रकमेतून रुपये १९ हजार ५०० चा धनादेश देऊन एका खाजगी कंपनीकडून घनकचरा निर्मूलन करिता एक सोल्युशन घेऊन ते दिले जाईल, असे सांगितले होते. तसेच गेम पोर्टल नोंदणीसाठी सुमारे ६ हजार रुपये इतक्या रकमेच्या धनादेशाची मागणी केली होती. या विरोधात सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र संलग्न चंदगड तालुका सरपंच परिषदेने गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन दिले होते. तथापि तालुका पातळीवर याचा निर्णय न झाल्याने  दि. १०/११/२०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली. असता मा. सीइओ यांनी धनादेश न देता संबंधित सोल्युशन ग्रामपंचायत पातळीवर लेखा संहितेनुसार कोटेशन मागवून खरेदी करावे, तसेच गेम पोर्टल साठी सुद्धा ६ हजार रुपये भरण्याची गरज नसल्याचे नमूद करून तसे दूरध्वनीवरून गटविकास अधिकारी यांना सूचित केले. त्यामुळे भविष्यात असे गैरप्रकार होणार नाहीत अशी अशा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.  चंदगड सरपंच परिषदेचे पदाधिकारी आर जी  पाटील, (सरपंच धुमडेवाडी), सी ए पाटील  (सरपंच म्हाळेवाडी), तानाजी पवार (सरपंच विझणे), मनोहर कांबळे (सरपंच सुंडी), राजेंद्र कांबळे (सरपंच नांदवडे), जोतिबा आपके (सरपंच कानूर खुर्द), सुभान गावडे (सरपंच हल्लारवाडी) आदींनी या कामी पाठपुरावा केला.

No comments:

Post a Comment