पैलवान सिकंदर शेख ठरला नवा 'महाराष्ट्र केसरी' - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2023

पैलवान सिकंदर शेख ठरला नवा 'महाराष्ट्र केसरी'


पैलवान सिकंदर शेख

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत पैलवान सिकंदर शेख (वाशिम) याने मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. गत वर्षीच्या महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षेला अटी तटीच्या लढतीत चितपट केले. यावेळी सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी किताबाची चांदीची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सेमी फायनलमध्ये पै. सिकंदर शेख यांने पै. संदीप मोटे याला तर पै शिवराज राक्षे यांने पै. हर्षद कोकाटे याला पराभूत करून फायनल गाठली होती.

    या स्पर्धेत ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे ४३ संघ सहभागी झाले होते. एका संघात गादी विभागातील १० आणि माती विभागातील १० असे २० पैलवान, दोन कुस्ती मार्गदर्शक आणि एक संघ व्यवस्थापन अशा एकूण २३ जणांचा सहभाग होता. या कुस्ती स्पर्धेत ४८० पैलवान, ८४ मार्गदर्शक, ४२ संघ व्यवस्थापक, ८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जण सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment