कालकुंद्री येथे हस्ताक्षर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2023

कालकुंद्री येथे हस्ताक्षर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे दिनांक 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 9.30 या वेळेत विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे त्यांचे हस्ताक्षर. जे कधी क्षर होत नाही, नष्ट होत नाही ते म्हणजे अक्षर. आजच्या संगणकाच्या युगातही सुंदर अक्षराचे महत्व तितकेच टिकून राहिले आहे. सुंदर अक्षर म्हणजे आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. आणि ही ओळख आपल्याला देण्यासाठी सरस्वती विद्यालयात हस्ताक्षर दीपोत्सव साजरा करण्यासाठी चार दिवसाच्या हस्ताक्षर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या हस्ताक्षर दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन आपले हस्ताक्षर सुधारून घ्यावे असे कार्यशाळेचे आयोजक आणि हस्ताक्षराचे मार्गदर्शक सुभाष बेळगावकर यांनी कळविले आहे. या हस्ताक्षर शिबिराचे आयोजन चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment