चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जिल्हा परिषदेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना २१००० रु. इतकी रक्कम देणेत आली आहे. त्यामधून संपूर्णम सोल्यूशन, ठाणे या कंपनीकडील सोल्यूशन खरेदी करण्याबाबत सूचीत केले आहे. ज्या सोल्यूशन मुळे घनकचर्याचे रूपांतर सेंद्रीय खतामध्ये होणार आहे. सोबत या कंपनीच्या नावे १९५०० रु.चा धनादेश काढा असे ग्रामसेवकांना सांगण्यात आले आहे. परंतु सरपंच परिषदेने यावर आक्षेप घेत ग्रामपंचायत लेखा संहितेनुसार सदर सोल्यूशन खरेदी केली जाईल, अन्यथा जि. प. ने आपण खरेदी करून ग्रामपंचायतीला सोल्यूशन पुरवावे असे स्पष्ट केले. त्याचबरोबर जेम पोर्टल नोंदणीसाठीही ६००० रु. इतकी रक्कम जास्त होत असून वर्षभरात ग्राम पंचायतींची खरेदी सुद्धा इतकी होणार नसून लहान ग्रामपंचायतीना हे परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment