वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी साहित्याचे वाटप, पतसंस्था स्थापन करणार - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2023

वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळी साहित्याचे वाटप, पतसंस्था स्थापन करणार

 


गडहिंग्लज / प्रतिनिधी

        गडहिंग्लज येथील श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे गडहिंग्लज शहर परिसरातील विक्रेत्यांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील चर्चच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. फादर मन्तेरो, साताप्पण्णा कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले. संघटनेचे सचिव सुरेश खोत यांनी स्वागत करून संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली. 

      दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सभासद विक्रेत्यांना साहित्य दिले जात आहे. लवकरच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी पतसंस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. संघटनेच्या सर्व कार्यक्रमात प्रत्येकाने सक्रिय राहून सहभाग द्यावा. फादर मन्तेरो म्हणाले, संघटनेचे उपक्रम खूपच चांगले आहेत. संघटनेच्या सभासदांना सर्वप्रकारचे पाठबळ आणिविविध प्रकारची मदत दिली जाते. शासनाकडून काही सवलती मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कोणाच्याही मदतीशिवाय आपण संघटीतरित्या आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. यावेळी साताप्पाण्णा कांबळे, सुभाष धुमे, नामदेव लुगडे, बाळकृष्ण शेटके यांची भाषणे झाली. संघटनेच्या या उपक्रमाबद्दल विक्रेत्यांनी संघटनेला धन्यवाद दिले.

      संघटनेचे अध्यक्ष महादेव अडसुळे यांनी संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहन केले. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक प्रा . राजा शिरगुप्पे यांना आदरांजली वाहण्यात आली. आभार नामदेव लुगडे यांनी मानले. यावेळी आण्णासो नेवडे,संभाजी गंधवाले, विजय देवण्णावर, विजय सुतार, काशिनाथ गडकरी, शिवानंद पाटील, नामदेव लुगडे, दत्तात्रय घुगरे,कुमार करशेट्टी, डी. बी. लाड, महादेव अडसुळे, सुरेश खोत, सुशांत अडसुळे, मारूती केसरकर, विठ्ठल पोवार, सहदेव सावंत, रोहित कोकीतकर, भिमराव माने, सतीश शेटके, बाळकृष्ण शेटके, आनंद गुरव, रवि कोंडूसकर, अजित स्वामी, काशिनाथ पाटील, रमेश भोसले आदीसह संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. आभार नामदेव लुगडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment