भर पावसात जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते मनसेच्या शाखेचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2023

भर पावसात जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते मनसेच्या शाखेचे उद्घाटन

शाखा उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले व पदाधिकारी.

कागल / सी. एल. वृत्तसेवा

    लिंगनूर (ता. कागल) येथील शाखा अध्यक्ष संदीप यादव आणि शाखाउपाध्यक्ष रामदास मेधे यांच्या शाखेच्या फलकाचे अनावरण कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले आणि गावातील जेष्ठ व्यक्ती यांच्या शुभ हस्ते पार पडले. 

       यावेळी जिल्हा सचिव वैभव माळवे, जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ, तालुका अध्यक्ष विनायक आवळे, चिखली जि. प.  विभागअध्यक्ष गणेश सुतार, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभूते, माजी सरपंच प्रमोद खुराडे, पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, बाळकृष्ण खुराडे फौजी, कॉम्रेड हरिदास पोवार तसेच कार्यकर्ते आणि लिंगनूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment