चंदगड तालुका पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अध्यक्षपदी महेश बसापुरे, उपाध्यक्षपदी शहानुर मुल्ला यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2023

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अध्यक्षपदी महेश बसापुरे, उपाध्यक्षपदी शहानुर मुल्ला यांची निवड


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
   'मराठी पत्रकार परिषद मुंबई' संलग्न 'चंदगड तालुका पत्रकार संघ' (रजि.) अंतर्गत डिजिटल मीडिया विभागाच्या  अध्यक्षपदी  युवा संवाद न्यूज चे संपादक महेश बस्सापुरे (तुर्केवाडी), उपाध्यक्षपदी एस एम 7 न्यूजचे संपादक शहानुर मुल्ला (कोवाड), खजिनदारपदी अन्वेषण न्यूजचे पत्रकार तातोबा गावडा (मुगळी) तर सचिव पदी सी एल माझाचे संपादक संतोष सुतार (हलकर्णी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
   पत्रकार संघाचे  मावळते अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड येथे पार पडलेल्या सभेचे स्वागत सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील यांनी तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष संतोष सावंत-भोसले, सरचिटणीस चेतन शेरेगार, सहचिटणीस राहुल पाटील, खजिनदार प्रकाश ऐनापुरे, सल्लागार उदय कुमार देशपांडे यांच्यासह सदस्य संजय मष्णू पाटील, राजेंद्र शिवणगेकर, सागर चौगुले, संजय कुट्रे, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, विश्वास पाटील, संदीप तारीहाळकर, बाबासाहेब मुल्ला, नंदकिशोर गावडे, निवृत्ती हारकारे आदी सदस्य पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment