चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघ अजिंक्य,अंतिम सामन्यात प्रोग्रेस ग्रुपचा ४४ धावांनी पराभव - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2023

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघ अजिंक्य,अंतिम सामन्यात प्रोग्रेस ग्रुपचा ४४ धावांनी पराभव

चंदगड येथे चंदगड अर्बन बँक चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस चेअरमन दयानंद काणेकर व नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते स्विकारताना शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाचे मालक शिवाजीराव पाटील, राजेश पाटील व शेजारी विनायक पिळणकर व संजय चंदगडकर

चंदगड / प्रतिनिधी 

        येथील  चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या  मर्यादित षटकांच्या 'चंदगड अर्बन बॅंक चषक" २०२३ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात  प्रोग्रेस क्लबवर ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शिवाजी पाटील ज्वेलर्स संघाने अंतिम सामन्यात १२ षटकांत ९ गडी बाद ११२थावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना प्रोग्रेस क्लब ने ८ षटकांत सर्व गडी बाद ६८ धावा जमवल्या. चंदगड र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर  स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता.

      चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेला चंदगड शहरासह शेजारील गावांतूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये युवा स्पोर्ट्स संघाने तृतीय तर रेणूका फौंडेशन संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेळगावसह बांदा, निपाणी, कोनाळकट्टा, बेळगाव, बहादुरवाडीसह चंदगड येथील खेळाडू व संघानी भाग घेतला होता. अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती.

     मॅन ऑफ द सिरीज राजा शर्मा (प्रोग्रेस क्लब) उत्कृष्ट फलंदाज किरण पोवार (शिवाजीराव पाटील ज्वेलर्स), उत्कृष्ट गोलंदाज सोहेल शेख (प्रोग्रेस क्लब) तर मॅन ऑफ दि मॅच पुरस्कार अशिष बेहोरोल (शिवाजीराव पाटील ज्वेलर्स) यांची निवड करण्यात आली. या खेळाडूंना प्रत्येकी ३००० रू व चषक देण्यात आली. विजेत्यांना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष  बाबुराव हळदणकर, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, 

    संचालक अरूण पिळणकर, उपसरपंच मोहन कुंदेकर, प्रदीप कडते, सुधीर देशपांडे, संचालिका सौ. अर्चना ढेरे, नगरसेविका माधुरी कुंभार, अनुसया दाणी, नेत्रदिपा काबंळे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, बाबुराव हळदणकर, सुरेश सातवणेकर, प्रमोद कांबळे, सुनिल काणेकर, पांडुरंग काणेकर, बँकेचे मॅनेजर नौशाद मुल्ला, झाकीर नाईक, नगरसेवक सचिन नेसरीकर, अभिजित गुरबे, अरूण गवळी, संतोष वणकुंद्रे, निंगु पाटील, शोधन कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. 

     १२ दिवस चाललेल्या या सामन्यामध्ये काही वेळा परतीच्या पावसाने अडथळा आणल्यामुळे स्पर्धा लांबली. या स्पर्धेसाठी हिदायत नाईक व जोतीबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. आजच्या स्पर्धेचे सर्व नियोजनाबरोबरच पाहुण्यांचे स्वागत व उत्कृष्ट सूत्रसंचालन संजय चंदगडकर यांनी केले. विनायक पिळणकर यांनी स्पर्धा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत स्कोर स्कोर लिहिण्यापासून ते संघांना निमंत्रित करण्यापर्यंत महत्वाची सर्व जबाबदारी पार पडले.

     सामन्यांचे संपुर्ण समालोचन जमीर आगा व राजा नाईक यांनी उत्कृष्टरित्या केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय ताशिलदार, विनायक पिळणकर, उद्देश गणाचारी, स्वप्निल धाटोंबे, जमीर आगा, राजा नाईक, हिदायत नाईक, सोन्या गुरव, मनोज धाटोंबे, गुंडू काबंळे, खुबुद्दीन शेरखान, मारुती कुंभार आदीनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment