'वेगळ्या वाटा' साहित्य पुरस्कारांचे २ डिसें. रोजी कोवाड येथे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2023

'वेगळ्या वाटा' साहित्य पुरस्कारांचे २ डिसें. रोजी कोवाड येथे वितरण

                      

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठान कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, २०२३' चे वितरण शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी श्री राम विद्यालय कोवाड येथे ११.०० वाजता होणार आहे. 

     ज्ञानेश्वर जाधवर, पुणे (कादंबरी- कुस), नंदू साळोखे, उत्तूर (कादंबरी- इपकाळ), भाऊसाहेब मिस्तरी, ते. संभाजीनगर (कादंबरी- रंधा) हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. विजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास डॉ. आर. ए. कुंभार (प्राचार्य मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर), जिप. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, राहुल अशोकराव देसाई (कोवाडकर सरकार), नामदेवराव माळी (माजी गटशिक्षणाधिकारी चंदगड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment