चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत पाटील तर उपाध्यक्षपदी संतोष सावंत-भोसले यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2023

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत पाटील तर उपाध्यक्षपदी संतोष सावंत-भोसले यांची निवड


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
      'चंदगड तालुका पत्रकार संघाच्या' नुकत्याच झालेल्या सभेत पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत  पाटील (कालकुंद्री), उपाध्यक्षपदी चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले (उत्साळी),  खजिनदार दै. महान कार्य चे चंदगड प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे (पाटणे फाटा), सरचिटणीस दै. स्वतंत्र प्रगती व सी एल न्यूज चे पत्रकार चेतन शेरेगार (चंदगड)तर सहचिटणीसपदी साप्ताहिक सत्यघटना चे संपादक राहुल पाटील (यशवंतनगर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सल्लागारपदी नंदकुमार ढेरे, अनिल धुपदाळे, उदय कुमार देशपांडे यांची निवड करण्यात आली.
  पत्रकारांची मातृसंस्था 'मराठी पत्रकार परिषद मुंबई'शी संलग्न असलेल्या'चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) ची सभा नुकतीच सी एल न्यूज कार्यालय चंदगड येथे मावळते अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्वागत सी एल न्यूज चे संपादक संपत पाटील यांनी तर प्रास्ताविक संस्थापक सदस्य अनिल धुपदाळे यांनी केले. सभेच्या सुरुवातीस २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
   यावेळी पत्रकार संघाचा २९ वा वर्धापन दिन साजरा करणे, मराठी पत्रकार परिषदेच्या कर्जत  येथील अधिवेशनास उपस्थित राहणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत अभिनंदन करणे, पत्रकार संघ आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट स्पर्धा- २०२४' चे नियोजन, मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करणे आदी विषयांवर चर्चा व ठराव करण्यात आले. यावेळी संजय मष्णू पाटील, राजेंद्र शिवणगेकर, सागर चौगुले, संजय कुट्रे, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, विश्वास पाटील, संदीप तारीहाळकर, बाबासाहेब मुल्ला, नंदकिशोर गावडे, निवृत्ती हारकारे आदी सदस्य पत्रकार उपस्थित होते. सागर चौगुले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment