माडखोलकरमध्ये संविधान दिन संपन्न |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इतिहास विभाग व प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते संविधान व बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी 26/11 च्या शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रा. ए. डी. कांबळे यांनी संविधान दिनाविषयी माहिती व उपस्थितांना संविधानाची शपथ दीली. डॉ. टी. एम. पाटील यानी आभार मानले. यावेळी प्रा. एम. एस. दिवटे, पी. जी. कांबळे, स्वयंसेवक, विद्यार्थी व स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment