महागाव येथे अखलाक मुजावर यांच्या घरी झालेल्या तुळशी विवाह प्रसंगी सहभागी झालेले विविध जाती धर्मांतील महिला व पुरुष |
महागाव : सी. एल. वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) येथे मुस्लिम बांधवांच्या घरी हिंदू धर्मातील परंपरेनुसार तुळशी विवाह हा धर्मिक कार्यक्रम संपन्न झाला. महागाव येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते आखलाकभाई मुजावर व त्यांचे कुटुंबीय गेली अनेक वर्ष आपल्या अंगणातील तुळशी चा विवाह तुळशी पौर्णिमेला धार्मिक विधीनुसार उत्साहाने करतात.
याप्रसंगी महागाव येथील सर्व जाती धर्मांचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. यंदाही मुजावर कुटुंबीयांनी आपल्या घराच्या अंगणात तुलसी विवाह कार्यक्रम घेऊन समाजात जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विघ्न संतोषी लोकांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. अखलाक मुजावर यांच्या घरी दरवर्षी होणारा तुळशी विवाह महागाव व पंचक्रोशीत एक चर्चेचा विषय बनून राहिला आहे.
No comments:
Post a Comment