चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात मराठा संघटन व आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकल मराठा समाजामार्फत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी ठीक १० वाजता रॅली चंदगड येथील श्री देव रवळनाथ मंदिरा पासून निघणार आहे चंदगड पासून आसगाव मार्गे हेरे, सावर्डे, नांदवडे, करंजगाव, हलकर्णी वरून अडकूरकडे जाऊन इब्राहिमपूर कानूर मार्गे पुन्हा रवळनात मंदिर येथे रॅलीची सांगता होणार आहे. तरी ज्या-ज्या गावांमध्ये रॅली जाईल. त्या-त्या गावातील सर्व मराठा बांधवांनी रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे सकल मराठा समाजामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment