कवी, लेखक जयवंत जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. मलगोंडी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेळगांव शब्दगंध कवी मंडळाच्या वर्धापन दिना निमित्त सरस्वती वाचनालय शहापूर (बेळगाव) येथे आयोजित कार्यक्रमात कोवाड (ता. चंदगड )येथील कवी व लेखक जयवंत जाधव यांच्या `वळणं आणि वळण` या आत्मकथात्मक पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध कवी आबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अलगोंडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "लेखकानी आपल्या वाट्याला आलेले विविध जीवनानुभव तटस्थ व ओघवत्या भाषेत लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांचे अनुभव निश्चितच प्रेरणादायी ठरतील अशी खात्री आहे. "
जयवंत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "आपण जे जगतो तेच लिहलं पाहिजे या विचारांना अनुसरून माझ्या जीवनात आलेली अनेक वळणं पार करत एका विशिष्ठ वळणापर्यतचे आलेले अनुभव प्रवास या पुस्तकातून व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील माणूस गरिबीशी झुंजत स्वतःला कसं घडवत असतो हे या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे."
यावेळी प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, कवी सुधाकर गावडे, श्रीमती अश्विनी ओगले, श्रीमती उर्मिला शहा, कवी बसवंत शहापूरकर, सुभाष सुंठकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जयवंत जाधव यांचे यापूर्वी होरपळ (कवितासंगह २०१६), काहुर (कवितासंग्रह २०१८), कौल (कथासंग्रह २०२१) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या कौल या कथासंग्रहाला करवीर साहित्य परिषदेचा (कसाप) प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार, न्युजपेपर साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथासंग्रह हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment