महागाव / सी. एल. वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहात नवरोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये फार्मसी महाविद्यालयाचा उदय पाटील प्रथम, पॉलिटेक्निकचे वेदांत पोटे पाटील द्वितीय तर आयुर्वेद महाविद्यालयाचा योगेश लंगोटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन विश्वस्त डॉ. प्रतिभा चव्हाण, प्रा. कल्याणी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय परंपरा व उत्सवाचे जपणूक व्हावी. यासाठी या हेतूनेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रील, सिंगल व ड्युएट, उत्कृष्ट वेशभुषा,गरबा, घूमरनृत्य या प्रकारात स्पर्धा झाल्या काही विद्यार्थ्यांनी गोलाकार फेर धरीत नृत्य सादरीकरण केले. पारंपरिक वेशभूषा, विविध नृत्यप्रकार सोबतीला नॉन स्टॉप म्युझिकल लाईट, हिंदी व मराठी डीजेने तर रंगतच आणली. उत्साह संचारत एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्याने तर उपस्थिताची मने जिंकली. यामध्ये आयुर्वेद, फार्मसी, नर्सिंग, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला यातील विजेत्या स्पर्धाकांना विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, रजिस्टार शिरीष गणाचार्य, विकास अधिकारी प्रा. डी. बी. केस्ती, प्रा. अमरसिंह फराक्टे सह इतर मान्यवरानी रोख बक्षिसे व आकर्षक गिफ्ट देऊन गौरविण्यात आला.
No comments:
Post a Comment