चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कानूर खुर्द (ता. चंदगड) येथे सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत कानुर खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेच्या मोफत आमचे आयोजन केलेले आहे. अशी माहीती जिल्हा परिषद सदस्य, चंदगड अर्बन बँक संचालक, भारतीय जनता पार्टी कोल्हापूरचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बल्लाळ यांनी दिली.
१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्याससाठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थांनी या योजनेचा लाभा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे:
https://pmvishwakarma.gov.in/
1. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
2. पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
3. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये थे रूपे कार्ड दिले जाणार आहे
5. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे
कोणाला घेता येणार लाभ
• सुतार • लोहार • सोनार • कुंभार न्हावी फुलारी • धोबी शिंपी • मेस्त्री चर्मकार • असकार • बोट बांधणारे अवजारे बनवणारे खेळणी बनवणारे चावी बनवणारे • मासेमारचे जाळे विणणारे
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड • बँक पासबुक झेरॉक्स
• मोबाईल नंबर (आधार लिंक असावे) व्यक्ती स्वतः
No comments:
Post a Comment