लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची चंदगड येथे आढावा बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2023

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची चंदगड येथे आढावा बैठकचंदगड / प्रतिनिधी 

     आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे सरचिटणीस तथा कोल्हापूर लोकसभा संघटक बाळा शेडगे, तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

   यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन वाढवणे, पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधणे, सध्याची राजकीय परिस्थिती, नवीन पद नियुक्ती या विषयावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे, चंदगड विधानसभा उपसंघटक नरेंद्र तांबोळी, कागल विधानसभा उपसंघटक प्रकाश मते, राधानगरी विधानसभा उपसंघटक नरेंद्र जायले, उपसंघटक योगेश खडके, जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, चंदगड तालुका अध्यक्ष राज सुभेदार, तालुका सचिव तुकाराम पाटील, विनायक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंदगड तालुका उपाध्यक्षपदी रमेश पाटील, शुभम गडकरी, संजय पाटील, तर विभाग अध्यक्षपदी बाळा गिरी, मष्णू अंबेवाडकर, उपविभाग अध्यक्षपदी विठ्ठल सावंत, कोवाड शहर अध्यक्षपदी सुनिल तलवार यांची नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment