चंदगड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मा शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर अंतर्गत दौलत विश्वस्त संस्था हलकर्णी (ता. चंदगडा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर हजगोळी (ता चंदगड )येथे मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे . या शिबिराचा उद्घाटन सोहळा 2 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता संपन्न होणार आहे . या उद्घाटन सोहळ्याला चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक नितीन सावंत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत . तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक श्री टी एम चौगले उपस्थित राहतील . उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील व्यवस्थापक मनोहर होसुरकर संचालक बाबू शिंदे व आदी मान्यवर संचालक हजगोळी सरपंच शीतल पवार, उपसरपंच दीपक पाटील सर्व सदस्य आजी माजी सर्व सरपंच सदस्य ग्रामस्थ मंडळी व्यासपीठावरती उपस्थित असणार आहेत .
सात दिवसांच्या या शिबिरात विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत . सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत विविध उपक्रम राबवले जातील योगा प्राणायाम व प्रार्थना अल्पोपहार हजेरी व कामाचे नियोजन श्रमदान गटचर्चा ग्राम सर्वेक्षण चहापान बौद्धिक व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
तर दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्र निर्मितीत युवकांचे योगदान या विषयावर श्री सी यु शिपकुले दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चंदगडआणि डब्ल्यू डी जाधव सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चंदगड यांचे प्रबोधन पर व्याख्यान होईल . 4 जानेवारी रोजी भारतीय संस्कृती हळदीकुंकू समारंभ या विषयावरती शितल विशाल पाटील सुमन शिवाजी सुभेदार गटशिक्षणाधिकारी चंदगड इंद्रायणी पाटील शुभांगी पाटील यांचे व्याख्यान होईल .दिनांक पाच जानेवारी रोजी चंदगड शेती अधिकारी अनिकेत माने शेती व्यवसायासाठी शासनाच्या योजना या विषयावरती प्रबोधन करतील . दिनांक सहा जानेवारी रोजी जगाचाआदर्श राजा छत्रपती शिवाजी राजा या विषयावरती डॉ मधुकर जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शिबिरार्थींचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल . शिबिर समारोप समारंभ सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे यासाठी डॉ ज्ञानराजा चिघळीकर डॉ एस एन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी दौलत उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकराव जाधव उपस्थित राहणार आहेत . प्रसंगी गोपाळराव पाटील व आदी सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत . विशेष श्रमसंस्कार शिबिराला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. बी . डी . अजळकर प्रकल्प अधिकारी प्रा . यु एस पाटील प्रा. आर व्ही पाडवी व प्रा. एस पी गावडे यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment