चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन

  


चंदगड / प्रतिनिधी

        महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १ ९ ६५ चे कलम ११ ९ ( २ ) व १२४ अन्वये चंदगड नगरपंचायत हद्दीतील झोन १ ते ४ मधील सर्व मिळकतदार व भोगवटादार यांना काळविणेकरीता प्रशिध्द करणेत येते कि , सन २०२३ २०२४ चे चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबत ज्या घरमालकांनी . / भोगवटादारांनी स्वत : किंवा त्यांच्या अभिकार्त्यामार्फत कर आकारणीबाबत ज्या हरकती सादर केल्या होत्या त्यांचे म्हणणे प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी तथा नगर रचनाकार , सहाय्यक संचालक , नगररचना विभाग कोल्हापूर , शाखा कोल्हापूर यांनी समक्ष ऐकून घेऊन व त्याबाबत निर्णय देऊन महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १ ९ ६५ चे कलम १२१ ( २ ) अन्वये नगरपंचायत क्षेत्रातील झोन १ ते ४ मधील करपात्र मिळकतींचे चतुर्थ वार्षिक कर आकारणी २०२३ - २४ पूर्ण झाली असून कर आकारणीच्या याद्या ( असेसमेंट लिस्ट ) कायद्यातील तरतुदीप्रमाणे उक्त नमूद प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी यांनी अंतिमरीत्या अधिप्रमाणित करणेत आलेले आहे . आहे . येणे प्रमाणे २०२३-२४ ते २०२६-२७ या करीताचे चतुर्थ वार्षिक कर आकारणी सन २०२३ २४ या वर्षापासून लागू करणेत येत आहे . वरीलप्रमाणे अधिप्रमाणित करणेत आलेल्या अंतिम कर आकारणी याद्या आजपासून ज्या त्या मिळकतीचे मालक अगर भोगवटादारास अगर अशा इसमाचे अभिकर्त्यास पाहणेसाठी नगरपंचायतेच्या कर विभागाकडे सुट्टीखेरीज ऑफिस वेळेत पाहणीसाठी खुल्या ठेवणेत आल्या आहेत . त्या पहानेत याव्यात व येणारा घरफाळा बिलाचे मुदतीत भरणेची तजवीज करावी.



No comments:

Post a Comment