आईंच्या स्मरणार्थ एम. जे. पाटील यांच्याकडून सार्वजनिक वाचनालयास पुस्तके - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2023

आईंच्या स्मरणार्थ एम. जे. पाटील यांच्याकडून सार्वजनिक वाचनालयास पुस्तके

कालकुंद्रीतील ज्ञानदीप वाचनालयास पुस्तके भेट देताना एम जे पाटील, सुजाता पाटील आदी 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्रीतील सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील यांच्या मातोश्री कै. रुक्मिणी जोतीबा पाटील यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ पाटील यांनी गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास ७ हजार रुपये किमतीची २१ पुस्तके देऊन पुस्तकांच्या रूपात आईची आठवण चिरंतन ठेवली आहे.

   कालकुंद्री येथील सुवर्ण भारत फ्रेंड सर्कल आयोजित छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सामान्यज्ञान स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ही पुस्तके वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यावेळी एमजे पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी  माजी जि. प. सदस्या सुजाता पाटील, सांगली येथील कथाकथनकार सर्जेराव खरात, सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सेवा सोसायटी चेअरमन अशोक पाटील, प्रा. जाॅर्ज क्रुझ व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment