बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर मार्फत बेळगाव येथे ४ जानेवारी २०२४ पासून अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ४ रोजी देशभरातून येणाऱ्या सर्व जातीच्या उमेदवारांची चाचणी होईल. दिनांक ५ रोजी अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील उमेदवारांची चाचणी होईल. ६ रोजी नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम येथील उमेदवारांची चाचणी होईल. ८ रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील उमेदवारांची चाचणी. तर ९ जानेवारी रोजी माजी सैनिकांच्या मुलांसाठी चाचणी होणार आहे.
१० मार्च २०२४ रोजी लेखी परीक्षा होणार असून अग्नीवीर जीडी, अग्नीवीर ट्रेड्समन, अग्नीवीर क्लार्क, एसकेटीसाठी १७ ते २१ वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला आहे. अग्नीवीर म्हणून भारतीय आर्मीत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक संधी आहे.
No comments:
Post a Comment