पत्रकार आणि शिक्षक यांनी दिले मांजराला जीवदान ! कुठे, वाचा चंदगड लाईव्ह! - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2023

पत्रकार आणि शिक्षक यांनी दिले मांजराला जीवदान ! कुठे, वाचा चंदगड लाईव्ह!

  


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

     रविवार (दि.१७) संध्याकाळची वेळ. नेसरी येथील पत्रकार रवींद्र  हिडदुगी व निवृत्त प्राथमिक शिक्षक टी. बी. कांबळे  नेसरी - चंदगड राज्य मार्गावर फिरायला गेले होते. अर्ध्या तासानंतर तळेवाडी गावापर्यंत फिरून परतीच्या मार्गावर येत असताना सायंकाळी साडेसहाची वेळ होती. अंधार पडला होता. वाहनांचे लाईट चालू होते.  

     याच दरम्यान सागर नांदवडेकर यांच्या कॉम्प्लेक्स समोर जिथे लक्झरी बसेस थांबतात. त्या रस्त्यावर एक मांजर पडले होते. काहीही हालचाल नव्हती. दुचाकी व चारचाकी वाहने जात - येत होती. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या मांजराला चुकवून वाहने पुढे जात होती, इतक्यात  पत्रकार रवींद्र  हिडदुगी यांचे लक्ष त्याकडे गेले. त्यांनी टी. बी. कांबळे यांना म्हटले मांजराला उचलून रस्त्याच्या बाजूला टाकूया नाहीतर त्याच्यावरून गाडी गेली तर रक्त सांडेल.  

    यानंतर लगेच रवींद्र यांनी काहीही हालचाल नसलेल्या त्या मांजराला उचलून घेतले. त्याच्या शरीराला कोणतीही जखम दिसली नाही,  मात्र त्याला रस्ता ओलांडताना कोणत्यातरी वाहनाने ठोकरले होते. त्यांचे शरीर गरम होते. शेजारी असलेल्या विनायक जाधव यांच्या दुकानातून पाणी आणून त्या मांजराला

 पाणी आणले. तो पर्यंत त्याची साधारण हालचाल जाणवली. तोंड उघडून पाणी पाजवले असता त्याने डोळे उघडले. बेशुद्ध पडलेले मांजर शुद्धीवर आले. पाच मिनिटांत ते उठून बसले. आणखी थोडे पाणी पाजल्यानंतर हालचाल करू लागले. या दोघांनी त्याला उचलुन फोटो काढले व त्या मांजराला खाली सोडताच तेथुन त्याने आपल्या घराची वाट धरली. तेथून पळून जातानाचा क्षण पाहून दोघेपण सुखावले. कदाचित त्याला रस्त्यावरून या दोघांनी उचलले नसते तर त्याचा शेवट नक्की होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.  मात्र या घटनेत दोघांची थोडीशी नजर त्याला वाचवण्यात कामी आली. त्याला जीवदान मिळाले.No comments:

Post a Comment