माडखोलकर कॉलेजमध्ये एड्स जनजागृती अभियान व रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2023

माडखोलकर कॉलेजमध्ये एड्स जनजागृती अभियान व रॅलीचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

  माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरामध्ये डॉ. पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील ५० किलो   ई कचरा व प्लास्टिक संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. 

     राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती अभियान  कार्यक्रम व रॅली काढण्यात आली. एड्स सप्ताहानिमित्त आयोजित  कार्यक्रमात एड्स विषयावर डॉ. एन. एस. मासाळ यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी डॉ. संजय पाटील होते. प्रास्ताविक डॉ. एन. के. पाटील यांनी केले तर आभार प्रा. आर. एस. पाटील यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी डॉ एस. डी. गावडे, पी जी कांबळे, शिवराज हासुरे व स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment