संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चंदगड येथे स्वच्छता मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2023

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चंदगड येथे स्वच्छता मोहीम


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     देशातील जनतेला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आपल्या आयुष्य वेचलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्त चंदगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गावागावातील रोगराई मरीआईला बकरा, कोंबडी कापून कमी होणार नाही. तर ती स्वच्छता केल्याने कमी होईल असा संदेश आपल्या कार्यातून, कीर्तनातून जीवनाच्या शेवटापर्यंत गाडगे महाराजांनी दिला. लोकांच्या देणग्यातून ठिकठिकाणी धर्मशाळा, वस्तीगृहे निर्माण करणाऱ्या आधुनिक संताला चंदगड येथे स्वच्छतेतून मानवंदना देण्यात आली.
    चंदगड येथील परीट समाजाच्या वतीने छ. संभाजी चौक व छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, विजय यादव, राजू लोकळ्ये, विनायक यादव, सतीश परीट, अवधूत यादव, औदुंबर मोरे, सागर नांदोडकर, गजानन परीट तसेच चंदगड नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment