चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातून आलेल्या अक्षता व प्रतिमा गावोगावी पोहोचवण्याचे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत अयोध्येहुन आलेल्या अक्षता व मंगल कलश यांची भव्य शोभायात्रा काढली जाणार असून दि. २३ रोजी ठीक अडीच वाजता चंदगड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून शोभायात्रेची सुरुवात होईल.
रवळनाथ मंदिरात सांगता होणार आहे. १८० सुवासिनी मंगल कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी होतील. तालुक्यातील प्रत्येक गावात कलश, प्रतिमा व अक्षता पोचविल्या जाणार आहेत.राम जन्मभूमी आंदोलनावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातून वीट पाठवण्यात आली होती. तसेच कार सेवा करण्यासाठी तालुक्यातून कार्यकर्ते अयोध्येत गेले होते. अशा कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी केला जाणार आहे. या शोभा यात्रेच्या स्वागतासाठी सर्वांनी रांगोळ्या घालाव्यात तसेच वातावरण मंगलमय करण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते करावे असे आवाहन हिंदुत्ववादी संघटना, वारकरी पंथ व सर्व संप्रदायांनी केलेले आहे. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वच संघटना व पंथ प्रमुखांनी केले आहे.
No comments:
Post a Comment