नाशिक येथील एथलेटिक क्रीडा स्पर्धेत कारवे येथील नरसिंग काबंळे यांना सुवर्णपदक,राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2023

नाशिक येथील एथलेटिक क्रीडा स्पर्धेत कारवे येथील नरसिंग काबंळे यांना सुवर्णपदक,राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  


चंदगड / प्रतिनिधी 

         कोल्हापूर येथील पोलीस दलातील धावपट्ट नरसिग कांबळे (मुळ गाव मौजे कारवे, ता. चंदगड) यांनी नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर एथलेटिक क्रीडा स्पर्धेत १५०० मिटर धावणे व ५००० मिटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले. तर ३००० मिटर धावणे अडथळा शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नरसिग काबंळे यांची गोवा येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील मास्टर एथलेटिक क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. या यशाने पोलिस दलासह चंदगड तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment