चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे शालेय आंतरवासिता भाग - २ कार्यक्रमाचा सांगता समारंभ टी. एस. चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रास्ताविक मायाप्पा पताडे यांनी केले.
यावेळी प्रा. ग. गो. प्रधान म्हणाले की, ``विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या संस्कारावर घडत असते. हिऱ्याचे पैलू सहज पाडता येत नाही तर त्याला निरखावे लागते. सौ. मृणालिनी वांद्रे यांनीही सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या व दि न्यू इंग्लिश स्कूलचे आभार मानले. टी. एस. चांदेकर यांनी ज्ञानार्जन करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते. आपला पहिला गुरू ही आपली आई असते असे सांगून सर्व प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत नाईक, सुरेखा कोळी, मयुरी कांडर यांनीही मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण कांबळे आणि स्नेहल सावंत यांनी केले. पाहुण्यांची ओळख निलम चव्हाण यांनी केली. आभार प्रिती चव्हाण यांनी मानले.
No comments:
Post a Comment