चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

 

रक्तदान शिबीरावेळी उपस्थित संस्थेचे संचालक, प्राचार्य व प्राध्यापक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व एड्स नियंत्रण कक्ष कोल्हापुर व रेड रिबन क्लब (RRC) च्या वतीने दि. 1 डिसेंबर, 2023 रोजी महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. "आता नेतृत्व समुदायाचे " या ब्रीद अंतर्गत जागतिक एड्स दिन व माडखोलकर जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, HIV व  इतर ब्लड टेस्ट करुन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान करताना विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी

      कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. प्रकल्प अधिकारी व कोल्हापुर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये HIV व इतरही टेस्ट करण्यात आल्या. यासाठी बेळगांव ब्लड बँक, बेळगांवचे विनायक मेणसे, डॉक्टर्स व टीमचे उत्तम सहकार्य लाभले.

       यावेळी डॉ. एस. डी. गावडे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. अंजली माने, प्रा. व्हि. के. गावडे, अर्जून गावडे, शिवराज हासुरे उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी संचालन केले. तर डॉ. एन. के. पाटील यांनी उपस्थितांचे आभार  मानले.

No comments:

Post a Comment