पारगड - मोर्ले किल्ला रस्ता पाच वर्षे बंद आवस्थेत, दशक्रोशीतील जनता आंदोलनाच्या तयारीत - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2023

पारगड - मोर्ले किल्ला रस्ता पाच वर्षे बंद आवस्थेत, दशक्रोशीतील जनता आंदोलनाच्या तयारीत

चंदगड / प्रतिनिधी
         गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या तसेच खितपत पडलेल्या सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता झाला पाहिजे यासाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यावर याला मान्यता मिळाली आणि कामाला सुरुवात झाली.पण दिड वर्षात  काम सुरू होऊन बंद पडले ते आजगायत बंद आहे त्यामुळे या भागातील लोकांना रस्ता नाही केलेला कच्चा रस्ता वाहुन गेला. चार वर्षांपासून पाठपुरावा करून देखील शासनाने मंञी महोदय यांची डोळेझाक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत अनेक मंञी महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.ही मंडळी मोर्ले पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी लक्ष घालणार काय? जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आपल्या दारी उपक्रम राबवतात मग पारगड किल्ला मोर्ले रस्ता रखडला का? याचे उत्तर सरकारने द्यावे. बांधकाम विभाग यांनी तातडीने कामाला सुरुवात केली नाही तर चालू महिन्यात दशक्रोशीतील गावातील लोक बांधकाम विभाग यांच्या विरोधात उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

   सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम चंदगड यांच्या ताब्यात असलेला  राज्य मार्ग १८७ मोर्ले ते पारगड किल्ला इसापूर चंदगड हा रस्ता चार वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे या भागातील अनेक गावांना अनेक यातना सहन कराव्या लागतात.
 वन विभाग नागपूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग १/२/२०२३ रोजी वन विभाग हद्दीतील ञुटींची पुर्तता करावी असे लेखी पत्र पाठवले पण सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेतली नाही असा आरोप आता पारगड दशक्रोशीतील ग्रामस्थ करू लागले आहेत.एव्हाना या मार्गावर वाहतूक सुरू झाली पाहिजे होती पण तसं झालं नाही. चार वर्षांपासून मोर्ले पारगड किल्ला रस्ता रखडला आहे होत्या त्या वाटा बंद पडल्या आहेत  वाहने जाऊ शकत नाही पायी चालणे कठीण झाले पण सरकार लक्ष देऊ शकत नाही.
 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आमदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर पालकमंत्री असताना मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला सुरुवात केली .पण दोडामार्ग हद्दीतील काम संबंधित ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीत केले नाही.पण चंदगड हद्दीत मात्र संबंधित ठेकेदार याने बहुतांश काम पूर्ण केले.पण वन विभाग यांनी  दिलेल्या मुदतीत बांधकाम विभाग काम पूर्ण करू शकले नाही त्यामुळे वन विभाग यांनी कामाला स्थगिती दिली. या नंतर पुन्हा मुदतवाढ घेऊन काम सुरू करणे बांधकाम विभाग यांची जबाबदारी होती पण त्यांनी ती पार पाडली नाही.
   कोल्हापूर येथे १३/०६/२०२३ रोजी शासन आपल्या दारी उपक्रम पार पडला यावेळी पारगड किल्ला वाशीय रघुवीर शेलार यांनी मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला सुरुवात करावी असे निवेदन दिले होते.पण याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. पुरावे जोडून निवेदन दिले होते.
   शिवकालीन पारगड किल्ला या ठिकाणी गेल्या शेकडो वर्षांपासून मोर्ले ते पारगड किल्ला पायवाट होती येथून ये जा करायचे पण ती वाट देखील रस्ता कापणी करताना बंद केली.
    मध्यंतरी कच्च्या रस्त्याने यायला जायला उन्हाळ्यात मिळत होते पण चार वर्षांपासून रस्ता बंद झाला त्यामुळे होता तो गायब झाला आहे त्यामुळे पायी चालत सोडा मोटार सायकल सोडा. गेल्या काही वर्षांत पारगड किल्ला मोर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांनी ३२ उपोषण आंदोलन केली पण मोर्ले ते पारगड किल्ला शासन पूर्ण करू शकले नाही त्यामुळे संताप व्यक्त होत आहे . दोन्ही तालुक्यातील दुर्गम गावातील ग्रामस्थ यांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम बांधकाम विभाग यांनी केले आहे असा आरोप रघुवीर शेलार यांनी केला आहे.
    राज्यातील सरकार छञपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे राज्य निर्माण करायच आहे असे सांगत आहेत तर दुसरीकडे छञपती शिवाजी महाराज यांच्या किल्यावर जाणारा रस्ता चार वर्षे रखडत ठेवते हेच काय विचारांचे राज्य सरकार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता करायचा नव्हता तर मग कोट्यवधी रुपये खर्च कशासाठी केले वाया घालवण्यासाठी.
   मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता पूर्ण झाला की कोल्हापूर आजरा चौकुळ इसापूर, चंदगड हेरा पाटणे, बेळगाव,जेलगुडी,मोटणवाडी,रायंदेवाडी,पार्ले,आंबेवाडी,वाघोञे,गुडवडे,कलिवडे,खामदाळे, पारगड,मिरवेल,गावे जवळचा मार्ग म्हणून जोडली जाणार आहेत.
 तर दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, घोटगेवाडी,केर, कोनाळकट्टा, तिलारी, साटेली भेडशी, दोडामार्ग गोवा जवळचा मार्ग ठरणार आहे. शिवाय घाट नसलेला रस्ता तयार झाला असता पण याकडे दुर्लक्ष झाले आहे.
    मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता हा सिंधुदुर्ग कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांतील महत्वाचा मार्ग रस्ता काम चार वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे हे मंत्री महोदय यांना माहिती आहे.पण बांधकाम विभाग यांची जबाबदारी ते टाळत आहेत. मोर्ले गावातील खाजगी जमीन संपादनास अद्याप सुरुवात झाली नाही.अंधाधुंदी कारभार सुरू आहे.तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या राज्यातील मंत्री महोदय यांनी मोर्ले पारगड किल्ला रस्ता कामाला सुरुवात करावी अन्यथा दशक्रोशीतील ग्रामस्थ यांना आंदोलन वेळी उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला आहे. मोर्ले गावातील खाजगी जमीन संपादनास लोकांना चांगला दर दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.
   मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता कामाला सुरुवात झाली पाहिजे सरकारला मंत्री महोदय यांना जाग आणण्यासाठी आता दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठे आंदोलन करतील असा इशारा आजी माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, पंकज गवस, प्रकाश पवार, विद्याधर बाणे, रघुवीर शेलार, मनोहर पवार,पंकज तेलंग,हेरे सरपंच शंकर चव्हाण,माजी सरपंच सुजाता मणेरीकर, इतरांनी दिला आहे.या संदर्भात निवेदन संबंधित बांधकाम विभाग वन विभाग यांना दिली जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते  रघुवीर शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment