म्हाळेवाडी येथे मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अज्ञाताला तात्काळ अटक करा, ग्रामस्थांचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2023

म्हाळेवाडी येथे मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अज्ञाताला तात्काळ अटक करा, ग्रामस्थांचे निवेदन

 


चंदगड / प्रतिनिधी 

        म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञाताने दारात उभ्या केलेल्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन म्हाळेवाडी ग्रामस्थानी कोवाड पोलीस ठाण्याला दिले.

      शनिवारी मध्यरात्री अज्ञाताने एका चार चाकी गाडीच्या चार ही काचा फोडल्या आहेत,तर एका दुचाकींचा हेडलाइट फोडला, तर धारदार हत्याराने दोन्ही टायर कापले आहेत. सदर घटना घडून आठ दिवस उलटून गेले आहेत. सदर गुन्ह्याची तक्रार पोलीस ठाणे कोवाड येथे अज्ञाता विरोधात केली आहे. अद्याप दोषींचा तपास लागलेला नाही. या घटनेमुळे जय भीम गल्ली व सर्व म्हाळेवाडी ग्रामस्थ यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गुन्ह्याचा योग्य तो तपास करून दोषींवर कडक कारवाई व्हावी. अशी मागणी जय भीम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

     कोवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतपाल काबंळे यांनी ग्रामस्थाचे निवेदन स्वीकारले. निवेदनावर एकनाथ काबंळे, धोंडिबा काबंळे, गंगाराम काबंळे, दीपक काबंळे, दयानंद काबंळे, मायाप्पा काबंळे, हणमंत काबंळे, विनोद काबंळे, विजय माने, संजय काबंळे, प्रमोद काबंळे, ज्ञानेश्वर काबंळे, विठ्ठल काबंळे, परशराम काबंळे, गुंडू काबंळे, प्रशांत काबंळे, राहूल काबंळे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.No comments:

Post a Comment